Foot health: शरीरातील अनेक गंभीर आजारांचे पहिले संकेत पायांमध्ये दिसतात, ही 7 लक्षणं वेळीच ओळखा

Surabhi Jayashree Jagdish

आजाराची पायांमध्ये दिसणारी लक्षणं

आपण शरीरातील इतर अवयवांची काळजी घेतो पण पायांकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. काही आरोग्याच्या समस्यांचे संकेत पायांमधूनही मिळू शकतात. पाय किंवा घोट्यांमध्ये दिसणारी काही लक्षणं ही एखाद्या गंभीर आजाराची सुरुवातीची चिन्हं असू शकतात.

Swollen feet | saam tv

पाय किंवा घोटे सुजणं

पाय किंवा घोट्यांवर सूज येणं म्हणजे शरीरात अतिरिक्त पाणी साचत असल्याचं लक्षण असू शकतं. यामागे हार्ट, किडनी किंवा यकृताशी संबंधित समस्या असण्याची शक्यता असते. काही वेळा शरीरात प्रोटीन, व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता असल्यामुळेही असा त्रास होऊ शकतो.

Swollen ankles | saam tv

घोट्यात सतत वेदना होणे

पाय किंवा घोट्यांमध्ये दुखणं हे दुखापत, संधिवात किंवा नसांशी संबंधित समस्येमुळे होऊ शकतं. चालताना वेदना वाढत असतील आणि विश्रांती घेतल्यावर कमी होत असतील तर ते स्ट्रेस फ्रॅक्चर किंवा ऑस्टिओपोरोसिसचं लक्षण असू शकतं.

Foot pain | saam tv

पाय बधीर होणं

पाय बधीर होणे किंवा सतत मुंग्या येणं हे नसांचं नुकसान झाल्याचं लक्षण असू शकते. या स्थितीला 'पेरिफेरल न्यूरोपॅथी' असं म्हटलं जातं. मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात दिसून येते.

Ankle pain | saam tv

पायात गोळे येणं

रात्री झोपताना किंवा दिवसभरात वारंवार पायात गोळे येत असतील तर शरीरात पाण्याची कमतरता असू शकते. त्यामुळे पुरेसं पाणी पिणं, पोषक आहार घेणं आणि झोपण्यापूर्वी हलका स्ट्रेचिंग व्यायाम किंवा पायांची हलकी मालिश करणं फायदेशीर ठरू शकतं.

Numb feet | saam tv

टाच दुखणं

टाच दुखण्याची समस्या अनेकांना जाणवते. यामागे प्लांटर फॅसिआयटिस हे एक सामान्य कारण असू शकतं. मात्र हा त्रास सतत होत असेल तर त्यामागे इतरही कारणे असू शकतात.

Diabetes symptoms | saam tv

पाय कायम थंड राहणं

काही लोकांचे पाय नेहमी थंड असतात. ही समस्या सामान्य वाटत असली, तरी काही वेळा ती गंभीर आजाराचे संकेतही देऊ शकते. रक्ताभिसरण नीट न होणं, शरीरात पोषक घटकांची कमतरता, थायरॉईडचा त्रास किंवा चुकीची जीवनशैली यामुळे पाय थंड राहू शकतात.

Heel pain | saam tv

टाचा फुटणं

टाचा फुटण्याचं कारण फक्त कोरडी त्वचा असेलच असं नाही. शरीरात व्हिटॅमिन ए, झिंक आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिडची कमतरता असल्यासही टाचा फुटू शकतात. याशिवाय मधुमेह, एक्झिमा, अनवाणी चालणं, अयोग्य पादत्राणं वापरणं किंवा जास्त कडक साबण वापरणं यामुळे ही समस्या वाढू शकते.

Plantar fasciitis | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Osteoporosis symptoms | saam tv

Liver Cancer: लिव्हरमध्ये कॅन्सरची गाठ तयार होत असताना पायांमध्ये दिसतात ही 3 विचित्र लक्षणं

leg cramps causes | SAAM TV
येथे क्लिक करा