Surabhi Jayashree Jagdish
नुकतंच आमिर खानने वयाच्या ६० व्या वर्षी त्याच्या नव्या प्रेमाची कबुली दिली आहे. मात्र यामध्ये असा प्रश्न उपस्थित होतो की, महिलांना वयाने मोठे पुरुषच आवडतात?
जगभरातील अभ्यासकांना हा प्रश्न पडल्याने याबाबत एक संशोधन करण्यात आलं. युरोपमध्ये झालेल्या या सर्व्हेक्षणात 51% महिला, 49% पुरुषांनी सहभाग घेतला होता.
या सर्व्हेक्षणानंतर, महिला तिच्यापेक्षा वयाने मोठ्या पुरुषाला डेट करतात. मात्र वय वाढल्यानंतर तिचे नातेसंबंधातील वय आणि इतर निकष बदलतात असं दिसून आलं.
मुलीचं वय वाढलं की, ती त्याच्यापेक्षा वयाने लहान किंवा समवयीन मुलाला डेट करते.
पुरुषाची आर्थिक स्थिती चांगली असेल समाजातील प्रतिष्ठित चेहरा असेल तर तरुण मुलीला असा पुरुष आवडतो.
अगदी पन्नाशीतल्या महिलाही सांस्कृतिक, सामाजिक गोष्टींनुसार वयाने मोठ्या पुरुषाला डेट करतात. मात्र प्रत्येक देशात याचं चित्र वेगळं दिसतं.