Ruchika Jadhav
ठाण्यामध्ये मित्रांसोबत फिरण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणं आहेत. येथे तुम्ही एकदा तरी भेट द्यायला हवी.
केळवा बीच येथे तुम्हाला सुर्योदय तसेच सुर्यास्ताचा आनंद घेता येईल. वन डे ट्रीपसाठी तुम्ही येथे कॅम्पमध्येही राहू शकता.
ठाण्यात सर्वात जुणे आणि पहिले हे वॉटर पार्क आहे. आतापर्यंत या वॉटरपार्कने अनेक पुरस्करही जिंकलेत. हे वॉटर पार्क तब्बल ११ एकरवर पसरलेलं आहे.
ठाण्यातील सर्वात मोठ्या मॉलपैकी कोरम मॉल हा एक आहे. यामध्ये तब्बल १३० हून अधिक ब्रँडेड शॉप आहेत.
ठाण्यातील कोरम मॉल परिसरात एक गणेश मंदिर देखील आहे. राजमाता जिजाऊ गणेश मित्रमंडळाचा हा बाप्पा फार प्रसिद्ध आहे.
ठाण्यात ट्रेकिंगसाठी येऊर हिल्स उत्तम पर्याय आहे. येथे काहीसा जंगल परिसर देखील आहे. अनेक तरुण एडवेंचरसाठी देखील येथे भेट देतात.
ओवळेकर वाडी, ओवळा गाव, टाकरडा रोड, घोडबंदर रोड, ठाणे येथे फुलपाखरू उद्यान आहे.