Kalwa Tourism : येणारा वीकेंड कुटुंबासोबत प्लान करा, फिरा कळव्याजवळचे ५ मस्त मान्सून पिकनिक स्पॉट्स

Shreya Maskar

कळवा

कळवा हे ठाणे शहर, महाराष्ट्रातील परिसर आहे, जो ठाणे महानगरपालिकेद्वारे प्रशासित आहे. तुम्ही येथे डोंबिवली , कल्याण ट्रेन पकडून जाऊ शकता. वन डे ट्रिपसाठी हे बेस्ट लोकेशन आहे.

Kalwa | google

उपवन तलाव

उपवन तलाव हे ठाण्यातील लोकप्रिय पिकनिक स्पॉट आहे.टेकड्यांनी वेढलेले हे ठिकाण शांत वातावरण देते. येथे पॅडल बोटिंग, किड्स झोन, लाईट शो आणि पाण्याकाठी खाद्यपदार्थांचा आनंद घेण्यासाठी अनेक स्थानिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उपलब्ध आहेत.

Upvan Lake | google

ब्रह्मळा तलाव उद्यान

संध्याकाळी ब्रह्मळा तलाव उद्यान येथे निवांत वेळ घालवू शकता. उद्यान येथील वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, छोटे मंदिर आणि सुंदर कारंजे यांसाठी प्रसिद्ध आहे.

Brahmala Lake Park | google

पारसिक हिल धबधबा

कळव्याच्या अगदी जवळ पारसिक हिल धबधबा वसलेला आहे. येथे तुम्ही भन्नाट फोटोशूट करू शकता. धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेऊ शकता.

Parsik Hill Waterfall | google

कचराळी तलाव

कचराळी तलाव हा गोड्या पाण्याचा (Freshwater) तलाव आहे. मध्यभागी एक लहान हिरवागार बेट, तसेच बोटिंगची सुविधा देखील येथे आहे.

Lake | google

मुम्ब्रा वॉटरफॉल

मुम्ब्रा वॉटरफॉल कळव्यापासून अगदी जवळ आहे. पावसाळ्यात परिसरात हिरवाई आणि पाण्याचे प्रवाह दिसतात. मोठ्या पावसानंतर पाण्याचा वेग वाढू शकतो, त्यामुळे स्थानिक परिस्थिती तपासूनच जाणे चांगले.

Mumbra Waterfall | google

येऊर हिल्स

येऊर हे पावसाळ्यात विशेष सुंदर दिसणाऱ्या ठिकाणांपैकी एक आहे. डोंगर, जंगल, हिरवाई, पक्षीनिरीक्षण आणि चालण्याचे, ट्रेकिंगचे पर्याय येथे आहेत. जून ते सप्टेंबरदरम्यान परिसर विशेष हिरवागार होतो.

Yeoor Hills | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : गणपतीला कोकणात गावी गेलाय? संगमेश्वरजवळील 'ही' ५ ठिकाणे फिरायला अजिबात चुकवू नका!

Sangameshwar Tourism | AI PHOTO
येथे क्लिक करा...