Shreya Maskar
ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्याला गेल्यावर फ्लेमिंगो पाहायला मिळतात. हे ठिकाण नवी मुंबईतील ऐरोली येथील किनारी (पाणथळ क्षेत्र) भागात आहे.
हिरव्यागार खारफुटीच्या जंगलांनी वेढलेले हे अभयारण्य प्रत्येक हिवाळ्यात हजारो स्थलांतरित फ्लेमिंगोंचे घर बनते. येथे निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
तुम्ही बोटीने प्रवास करून फ्लेमिंगो पाहायला मिळतात. तुम्ही वीकेंडला येथे ट्रिप प्लान करू शकता. लहान मुलांना तुफान मजा-मस्ती करता येईल.
ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य त्याच्या 'गुलाबी समुद्रा'साठी जगप्रसिद्ध आहे. येथे फ्लेमिंगोंचा थवा पाहायला मिळतो. तुम्ही भन्नाट फोटोशूट देखील करू शकता.
ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्याला तुम्ही नोव्हेंबर ते मे पर्यंत भेट देऊ शकता. उंच, फिकट-गुलाबी ग्रेटर फ्लेमिंगो आणि लहान, गडद रंगाच्या लेसर फ्लेमिंगो या दोघांसाठीही हे विश्रांतीचे ठिकाण आहे.
पक्षीप्रेमींनी आवर्जून येथे फ्लेमिंगो पाहायला जा. हे ठिकाण जगात भारी आहे. परदेशी पर्यटकही येथे गर्दी करतात.
फ्लेमिंगो त्यांच्या तेजस्वी गुलाबी पिसांमुळे, काठीसारख्या पायांमुळे आणि लांब, वाकड्या मानेमुळे लगेचच ओळखले जातात.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.