Thane Waterfall : पावसाळ्यात माथेरान, महाबळेश्वर विसरा; ठाण्यात लपलेला 'हा' धबधबा वीकेंड ट्रिपसाठी बेस्ट

Shreya Maskar

ठाणे

चिरमा देवी धबधबा ठाणे कासारवडवली येथील चिरमा देवी मंदिराजवळ आहे. हा धबधबा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या काठावर आहे. पावसाळ्यात वन डे ट्रिपसाठी हे बेस्ट लोकेशन आहे.

Thane | google

चिरमा देवी धबधबा

चिरमा देवी धबधबा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या 'येऊर हिल्स'मध्ये वसलेला आहे. तुम्ही येथे निसर्गाच्या सानिध्यात भन्नाट फोटोशूट करू शकता.

Chirma Devi Waterfall | google

छोटा ट्रेक

चिरमा देवी धबधबा घोडबंदर रोडच्या अगदी जवळ आहे. धबधब्यावर जाण्यासाठी १०-१५ मिनिटांचा ट्रेक करावा लागतो.

Short Trek | google

पावसाळा

चिरमा देवी धबधब्याच्या आजूबाजूचा हिरवागार परिसर आणि खळाळणारे पाणी, पक्ष्यांचा किलबिलाट पाहायला मिळतो. पावसाळ्यात याचे सौंदर्य खुलते.

Monsoon | google

निसर्ग सौंदर्य

चिरमा देवी धबधब्याचा छोटा ट्रेक करताना दाट झाडीतून आणि लहान ओढ्यांतून चालावे लागते.

Natural Beauty | google

कसं जाल?

चिरमा देवी धबधब्याला जाण्यासाठी ठाणे स्टेशनला उतरा. तेथून पुढे कासारवडवलीसाठी रिक्षा किंवा बसने प्रवास करा.

How to Reach? | google

ठाण्यातील पर्यटन स्थळे

ठाण्यात अनेक तलाव आहेत. तुम्ही उपवन तलाव, तलावपाळी या ठिकाणांना नक्की भेट द्या. तसेच ठाण्यात येऊर हिल्स हे देखील ठिकाण आहे. जे वन डे ट्रिपसाठी बेस्ट लोकेशन आहे.

Tourist Spots in Thane | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : सह्याद्रीतील अभेद्य लोखंडी दुर्ग! मुंबईहून लोहगड किल्ल्याला कसं जाल?

Lohagad Fort | saam tv
येथे क्लिक करा...