Dhanshri Shintre
टेस्लाने भारतीय बाजारात पाऊल ठेवले असून १५ जुलै रोजी मुंबई आणि दिल्ली येथे पहिले शोरूम सुरू केले आहे.
टेस्लाने भारतात आपली पहिली ५-सीटर कार मॉडेल Y लाँच केली असून तिची किंमत ५९.८९ लाख रुपये ठेवली आहे.
टेस्लाने चीनमध्ये इलेक्ट्रिक कारचे नवीन ६-सीटर व्हर्जन मॉडेल YL सादर केले असून किंमत ३३९,००० युआन (सुमारे ४१.१८ लाख रुपये) ठेवली आहे.
नवीन टेस्ला मॉडेल YL मध्ये बाह्य व अंतर्गत डिझाइनमध्ये सुधारणा करून ६-सीटर लेआउट दिले असून त्यामुळे कार अधिक आकर्षक बनली आहे.
टेस्ला कारच्या छताचे नवीन डिझाइन आणि मागील स्पॉयलरला स्पोर्टी लूक देण्यात आले असून वायुगतिकी सुधारण्यात आली आहे.
या टेस्ला कारची लांबी ४९७६ मिमी, रुंदी १९२० मिमी, उंची १६६८ मिमी असून व्हीलबेस ३०४० मिमी आहे.
मॉडेल YL च्या केबिनमध्ये १६-इंचाची नवीन टचस्क्रीन आणि समोरील ५०W/३०W जलद वायरलेस चार्जिंग पॅड अपग्रेड केले गेले आहेत.
ऑडिओ सिस्टीममध्ये सुधारणा करून नवीन सेंटर कन्सोल स्पीकर आणि दोन अतिरिक्त टॉप स्पीकर समाविष्ट केले गेले आहेत.
मॉडेल YL मध्ये तीन-पंक्ती एअरबॅग्ज असून, कंपनीनुसार संरक्षण क्षेत्र ३.९ मीटरपर्यंत पसरले आहे, केबिनच्या ९५% पेक्षा अधिक जागा व्यापते.
ड्युअल-मोटर ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टीम असलेल्या कारमध्ये पुढील मोटर १९० एचपी आणि मागील मोटर २६६ एचपी पॉवर देते.
मागील सीट्स फोल्ड केल्यानंतर कारमध्ये २,५३९ लिटरपर्यंत सामान ठेवण्याची जागा उपलब्ध होते, जी वापरकर्त्याच्या गरजेनुसार वाढवता येते.
कंपनीच्या माहितीनुसार, ही एसयूव्ही केवळ ४.५ सेकंदांत ० ते १०० किमी/ताशी वेग गाठू शकते.
ही कार ८२ किलोवॅट टर्नरी लिथियम बॅटरी पॅकसह सुसज्ज असून एका चार्जवर ७५१ किमी ड्रायव्हिंग रेंज देते.