ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जगातील सर्वात मोठी अमेरिकन इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला लवकरच भारतीय बाजारपेठेत एन्ट्री करणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकन कंपनी टेसलाने भारतात आपल्या पहिल्या शोरुमसाठी जागा आणि एरिया निश्चित केले आहे.
TOI च्या एका वृत्तानुसार, टेस्लाने मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मध्ये त्यांचे पहिले शोरूम उघडण्यासाठी करार अंतिम केला आहे.
करारानुसार, टेस्लाने बीकेसीमधील एका कमर्शियल टॉवरच्या तळमजल्यावर ४,००० चौरस फूट जागा भाड्याने घेतली आहे.
या शोरुमचे मासिक भाडे प्रति चौरस फूट ९०० रुपये असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच एका महिन्याचे भाडं सुमारे ३५ लाख रुपये असेल.
रिपोर्टनुसार, टेस्लाने ही जागा ५ वर्षांसाठी भाड्याने घेतली आहे. येथे टेस्ला आपल्या विविध प्रकारच्या कारचे प्रदर्शन करणार आहे.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एलोन मस्क यांची अमेरिकेतल्या भेटीनंतर टेस्लाने दिल्ली, मुंबई आणि पुणे सारख्या शहरांमध्ये विविध पदांसाठी रिक्त पदांची घोषणा केली होती.
लवकरच भारत सरकार इलेक्ट्रिक वाहन धोरणात बदल करू शकते. ज्यामुळे परदेशातून येणाऱ्या गाड्यांवरील कस्टम ड्युटी १५% पर्यंत कमी केली जाऊ शकते.