Dhanshri Shintre
जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाने आता भारतात आपली स्मार्ट इलेक्ट्रिक कार सादर करत नवीन पर्वाची सुरुवात केली आहे.
टेस्ला कंपनीने आपल्या भारतातील पहिल्या एक्स्पेरियन्स सेंटरची सुरूवात मुंबईच्या बीकेसी परिसरात केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी या टेस्ला एक्स्पेरियन्स सेंटरचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
टेस्ला कंपनीने भारतात लाँच होणाऱ्या Model Y इलेक्ट्रिक SUVची अधिकृत किंमतही जाहीर केली आहे.
Model Y च्या RWD व्हर्जनची किंमत ₹61.07 लाख असून, LR RWD व्हर्जनसाठी ₹69.15 लाख ठरवण्यात आली आहे.
टेस्लाच्या 3 RWD मॉडेलची कार केवळ 5.6 सेकंदांत 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठते.
Tesla 3 LR RWD ही इलेक्ट्रिक कार एकदा पूर्ण चार्ज केल्यावर तब्बल 622 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते.
टेस्लाच्या स्टँडर्ड RWD व्हर्जनची कार एकदा चार्ज केल्यावर सुमारे 500 किलोमीटरपर्यंत सहज प्रवास करू शकते.
नवीन Model Y मध्ये इंटेरिअर-एक्स्टेरिअरमध्ये बदल करून मागील सीटसाठी स्वतंत्र टचस्क्रीन व इलेक्ट्रिक अॅडजस्ट फिचर दिले आहेत.
Model Y ही कार BMW X1 LWB, Volvo C40, BYD Sealion 7 आणि Mercedes-Benz EQA यांना टक्कर देणार आहे.