Chetan Bodke
दोन बहिणींच्या जीवनावर आधारित असलेली ‘काव्यांजली - सखी सावली’ ही मालिका गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली.
मालिकेमधून प्रेक्षकांना दोन बहिणींच्या प्रेमळ नात्याची गोष्ट पाहायला मिळत आहे.
येत्या काही दिवसांत मालिकेमध्ये, काव्याची बहिण अंजली हिचं लग्न होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे.
काव्याने बहिण अंजलीच्या लग्नामध्ये खूप सुंदर लूक केलेला दिसत आहे.
काव्याने जांभळ्या रंगाची साडी परिधान केली असून, त्याला साजेसे दागिने घातले आहेत.
त्यासोबतच ग्लॉसी मेकअप करत चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
तर अंजलीने लग्नामध्ये लाल रंगाची साडी परिधान केली आहे. तर अंजलीच्या पतीनेही अंजलीला साजेसा लूक केला आहे.
तर काव्याच्या पतीनेही शेरवाणी परिधान केली आहे.