Chetan Bodke
‘दृष्यम’ फेम अभिनेत्री श्रिया सरन कायमच आपल्या फॅशनमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.
टॉलिवूडपासून ते बॉलिवूडपर्यंत सर्वच चित्रपटातल्या अभिनयामुळे श्रिया सरनने चाहत्यांचे मने जिंकली आहेत.
अभिनेत्री श्रिया सरनने तामिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला असून तिला बालपणापासून कथ्थकचीही आवड आहे.
अभिनेत्री श्रिया कायमच सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजातील नवनवे फोटो शेअर करत असते.
श्रिया सरनने जांभळ्या रंगाची फॅशनेबल साडी परिधान करत हटक्या अंदाजामध्ये फोटोशूट केले आहे.
तर मल्टीकलर ब्लाऊज आणि साडीचा पदर या हटक्या कॉम्बिनेशनने चाहत्यांचे लक्ष वेधले.
श्रियाने या फॅशनवर नॉर्मल मेकअप केलेला दिसत आहे. या लूकवर अभिनेत्रीचं सौंदर्य खूपच सुंदर दिसतंय.
श्रियाच्या ह्या नव्या लूकने चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या ह्या सौंदर्याचे चाहत्यांकडून चांगलेच कौतुक होत आहेत.
श्रियाच्या नव्या फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.