Siddhi Hande
सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे ट्रेंड सुरु असतात. सध्या सोशल मीडियावर गुगल जेमिनीवर एआय फोटो तयार करण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे.
सोशल मीडियावरील या ट्रेंडची भूरळ तरुणाईला पडली आहे. अनेक अभिनेत्रींनीदेखील हा ट्रेंड फॉलो केला आहे.
अभिनेत्री तेजश्री प्रधानाचेदेखील गुगल जेमिनी रेट्रो लूकमधील फोटो व्हायरल झाले आहेत.
तेजश्री प्रधानचे वेगवेगळ्या साड्यांवरील रेट्रो लूकचे फोटो तयार केले आहे.
तेजश्रीने काही फोटो स्वतः रिशेअर केले आहेत.
तेजश्रीचे लाल आणि काळ्या रंगाच्या साडीतील फोटो तयार केले आहेत. यात ती खूपच सुंदर दिसत आहे.
तेजश्रीने असे अनेक फोटो तिच्या चाहत्यांनी बनवले आहेत.हे फोटो खरेच असल्यासारखे वाटत आहे.
तेजश्री प्रधान या गुगल जेमिनी एआय फोटोंमध्येदेखील खूप सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.