Bharat Jadhav
Spam Calls मुळे अनेक लोकांना समस्यांना तोंड द्यावे लागतं. अनेकांना आर्थिक नुकसानही सहन करावं लागतं.
आज आपण स्पॅम कॉल्सपासून मुक्त होण्याचा एक पर्याय जाणून घेणार आहोत.
अनेक युझर्स WhatsApp वरही स्पॅम कॉल देखील येतात. हे कॉल सहजपणे ब्लॉक केले जाऊ शकतात. यासाठी व्हॉट्सअॅप सेटिंग्जमध्ये बदल करावे लागतील.
व्हॉट्सअॅप सुरू करा त्यानंतर उजव्या बाजूला दिलेल्या तीन ठिपक्यांवर क्लिक करा.
त्यानंतर सेटिंग्जमध्ये जा, त्यानंतर प्रायव्हसी या पर्यायावर क्लिक करा.
येथे कॉल्स पर्याय निवडावा. त्यानंतर प्रक्रियेत पुढे जा आणि तिथे Silence Unknown Callersवर ऑन करा.
ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अनोळखी नंबरवरून येणारे व्हॉट्सअॅप कॉल आपोआप बंद होतील.
अनोळखी नंबरवरून येणारे कॉल उचलण्यापूर्वी काही खबरदारी घेतली पाहिजे. सायबर गुन्हेगार तुमची आर्थिक फसवणूक करू शकतात.
येथे क्लिक करा