Manasvi Choudhary
सध्याच्या युगात फोन हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.
दैनंदिन जीवनात फोनचा वापर कायम असतो.
केवळ संवाद साधण्यासाठी नाही तर अन्य विविध कामांसाठी फोनचा वापर होऊ लागला आहे.
असे असताना फोन चोरीला गेल्यास मोठे नुकसान होते
हरवलेला फोन शोधणंही अत्यंत कठिण असते. यासाठी आम्ही आज काही टिप्स सांगणार आहोत.
सर्वप्रथम IMEI नंबरच्या मदतीने सरकारी पोर्टल सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्ट्रीला भेट देऊन फोन ब्लॉक करा.
फोनच्या Find My Device य फिचरद्वारे फोन ट्रॅक करा.
बँकिंग अॅप्समध्ये सिक्युरिटी पिन आणि लॉक असतो. पण तरीही, सावधगिरी म्हणून तुमचे पासवर्ड बदला. किंवा संबंधित बँकांना फोन करून व्यवहार थांबविण्याबाबत सांगा.