Priya More
टीम इंडियाचा खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविच यांचे ४ वर्षांचे नाते संपुष्टात आले आहे.
हार्दिक आणि नताशा यांनी घटस्फोट घेतला. दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली.
हार्दिकचा घटस्फोट झाल्याचे कळताच त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. सध्या त्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून हार्दिक आणि नताशा यांच्यामध्ये काहीच सुरळीत सुरू नव्हते. ते वेगळे होणार असल्याच्या चर्चाही होत्या.
हार्दिक आणि नताशाने मौन सोडत घटस्फोट घेतला असल्याचे जाहीर केले आहे. दोघांनी परस्पर संमतीने एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
आयपीएल २०२४ दरम्यान नताशाने तिच्या इन्स्टा हँडलवरून हार्दिकचे फोटो डिलीट केले होते. पण मुलासोबतचे फोटो तसेच ठेवले होते.
हार्दिकने इन्स्टा पोस्ट करत लिहिले की, '४ वर्षे एकत्र राहिल्यानंतर नताशा आणि मी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.'
'आमच्यासाठी कठीण निर्णय आहे. कारण आम्ही एकमेकांचा आदर आणि सहवास अनुभवत होतो.', असे हार्दिक म्हणाला.
'जसजसे आमचे कुटुंब वाढत गेले तसे आम्हाला अगस्त्यचा आशीर्वाद मिळाला. जो आमच्या दोघांच्या जीवनाचा केंद्रबिंदू राहील.', असे त्याने सांगितले.
गेल्या वर्षीपर्यंत हार्दिक आणि नताशा खूप आनंदात होते. दोघांनी गेल्या वर्षी लग्न केले होते.
२०२० मध्ये हार्दिक पांड्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करून नताशासोबत एंगेजमेंट केल्याचे स्पष्ट केले होते.