Parenting Tips: मुलांनी पालकांचा आदर करावा यासाठी लेकरांना शिकवा 'या' गोष्टी

Bharat Jadhav

सहानुभूती

मुलांना इतरांच्या भावना आणि इतरांविषयी सहानुभूती करण्यास शिकवा. त्यांच्या कृतीचा त्यांच्या पालकांवर आणि इतरांवर कसा परिणाम होतो. हे मुलांना सांगा?

Parenting Tips | Getty Images

संभाषण कौशल्य

संवाद महत्त्वाचा आहे. मुलांना त्यांचे विचार आणि भावना आदरपूर्वक व्यक्त करण्यास शिकवा. त्यांना पालकांचे म्हणणे व्यवस्थितपणे ऐकण्याचे शिकवा.

Parenting Tips | Getty Images

कृतज्ञता

मुलांना त्यांच्या पालकांनी केलेल्या प्रयत्नांची आणि त्यागचं महत्त्व सांगा.

Parenting Tips | Getty Images

जबाबदारी

मुलांना त्यांच्या कृतींची जबाबदारी घेण्याचे महत्त्व शिकवा. जेव्हा त्यांना त्यांच्या वर्तनाचे परिणाम समजतात, तेव्हा ते त्यांच्या पालकांचा आणि इतरांबद्दल आदर करतात.

Parenting Tips | Getty Images

सीमा आणि नियम सांगा

मुलांना त्यांच्या वागण्याच्या सीमा आखून द्या. त्याच्या वर्तणुकीत नियम घालून द्या. त्यांच्या वागण्यात आणि बोलण्या नियम का घातले त्याचे कारणही सांगा.

Parenting Tips | Getty Images

मुलांना संयमाचे महत्त्व सांगा

मुलांना वागण्यात आणि बोलण्यात संयम बाळगण्यास सांगा. पालकांचं म्हणणं संयमपूर्वक ऐकण्याची सवय मुलांना लावा.

Parenting Tips | Getty Images

दयाळूपणा

मुलांना पालकांसह इतरांप्रती दयाळूपणे वागण्यास सांगा. घरातील कामात मदत करणे. कौतुक करणं , सकारात्मक आदी गोष्टी मुलांना शिकवा.

Parenting Tips | Getty Images

संघर्ष सोडवण्याचा ट्रिक

मुलांना संघर्ष सोडवण्याचे मार्ग शिकवा. समस्यांवर शांतपणे चर्चा करणे, तडजोड करणे आणि आवश्यकतेनुसार माफी मागणे हेही शिकवा.

स्वातंत्र्य

मुलांना वयोमानानुसार जबाबदाऱ्या देऊन त्यांच्यात स्वातंत्र्याची भावना वाढवा. जेव्हा मुले स्वतःच कार्ये हाताळण्यास शिकतात, तेव्हा त्यांच्यात क्षमतेची भावना विकसित होते.

हेही वाचा

येथे क्लिक करा

love Tips | Saam Tv
Love Tips: समोरची व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते हे इशाऱ्यातून कसं ओळखाल