Bharat Jadhav
पहिल्या नजरेत प्रेमात पडल्याचा अनुभव अनेकांना असतो. पण समोरची व्यक्ती तुमच्यावर पूर्णपणे मोहात पडली आहे हे तुम्हाला कसे कळेल?
धी-कधी समोरची व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होते आणि तुम्हाला त्याची जाणीवही नसते, पण काही इशाऱ्याने ते तुम्हाला सांगत असतात. त्यामुळे इशाऱ्याची भाषा समजून घ्या.
जर कोणी तुमच्यासोबत खूप वैयक्तिक आयुष्य शेअर करत असेल समजून घ्या की, त्यांना तुमच्याबद्दल सर्व काही जाणून घ्यायचे आहे. तुम्ही त्या व्यक्तीचे क्रश आहात हे लगेच समजून घ्या.
तुम्हाला पाहून ते स्मित हास्य करतात. हे इशारे दिसले तर समजून घ्या ती व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित झालीय.
जर कोणी तुमच्या स्टाईलचे, स्माईलचे किंवा पेहरावाचे कौतुक करत असेल तर ते तुम्ही त्यांना आवडू लागले आहात हे समजा.
तुम्ही ज्यांना आवडतात ती व्यक्ती वारंवार तुमच्या आरोग्यबद्दल विचारत असते. नेहमी तुमची काळजी करते त्यावेळी समजून घ्या की त्यांच्या मनात तुमच्याविषयी काही भावना आहेत.
जर कोणी तुम्हाला वारंवार भेटण्यासाठी निमित्त शोधत असेल तर समजून घ्या की ती व्यक्ती तुमच्या प्रेमात पडलीय.
तुमच्याशी बोलत असताना समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज दिसते. तुमच्याशी बोलताना त्यांच्या डोळ्यात अधिक चमक असते.
येथे क्लिक करा