Manasvi Choudhary
अनेकांना सकाळी उठल्यानंतर चहा आणि ब्लॅक कॉफी पिण्याची सवय असते. आजही अनेकजण सकाळची कॉफी आणि चहाने करतात.
चहा आणि ब्लॅक कॉफी प्यायल्याने संपूर्ण दिवस शरीर एनर्जेटिक राहते. ताणतणाव दूर होण्यास मदत होते.
पण तुम्हाला माहितीये का? चहा की ब्लॅक कॉफी कोणते ड्रिंक शरीरासाठी अधिक फायदेशीर आहे.
चहा आणि ब्लॅक कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण अधिक असते. एक कप ब्लॅक कॉफीमध्ये ९० ते १०० मिलि कॅफीनचे प्रमाण असते. तर चहामध्ये २५ ते ५० मिलिग्राम कैफीनचे प्रमाण असते.
सकाळी उठल्यानंतर चहाऐवजी जर तुम्ही ब्लॅक कॉफी पित असाल तर यामुळे शरीर अॅक्टिव्ह राहते.
वजन कमी करण्यासाठी तुम्ही सकाळी ब्लॅक कॉफीचे सेवन करणे फायदेशीर असेल. ब्लॅक कॉफी मेटाबॉलिजम वाढवते यामुळे शरीराची चरबी कमी होण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.