Tea or Coffee After Meals: जेवल्यानंतर चहा पिणे योग्य की कॉफी? जाणून घ्या पचनावर काय होतो परिणाम

Shruti Vilas Kadam

जेवणानंतर लगेच चहा पिऊ नका

जेवण झाल्यानंतर लगेच चहा पिण्याची सवय अनेकांना असते. मात्र, चहामुळे जेवणातून मिळणारे आयर्न शरीरात योग्य प्रकारे मिळत नाही. त्यामुळे शरीरात आयर्नची कमतरता चहा पिणे टाळावे.

tea | pinterest

कॉफीमुळे पचनावर परिणाम होतो

कॉफी प्यायल्याने काही लोकांना लवकर शौचाला जाण्याची इच्छा होते. कारण कॉफीमधील कॅफिनमुळे आतड्यांची हालचाल वाढू शकते. मात्र, काही लोकांना कॉफी प्यायल्याने ॲसिडिटी आणि पोटात जळजळ होऊ शकते.

Tea or Coffee | Google

चहामध्येही कॅफिन असते

अनेकांना वाटते की चहा प्यायल्याने शरीरावर काही परिणाम होत नाही. पण चहामध्येही कॅफिन असते. जास्त चहा प्यायल्याने झोपेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे चहा कमी प्रमाणात प्यावा.

Tea

जेवणानंतर लगेच कॉफी पिऊ नका

जेवण झाल्यानंतर लगेच कॉफी प्यायल्याने काही लोकांना गॅस, ॲसिडिटी आणि पोटात जळजळ होऊ शकते. त्यामुळे जेवणानंतर लगेच कॉफी पिणे टाळावे.

Tea or Coffee

शरीरातील आयर्न कमी होऊ शकते

चहा आणि कॉफी प्यायल्याने जेवणातून मिळणारे आयर्न शरीरात कमी प्रमाणात मिळते. त्यामुळे ज्यांचे हिमोग्लोबिन कमी आहे, त्यांनी जेवताना किंवा जेवणानंतर लगेच चहा-कॉफी पिऊ नये.

Tea Or Coffee | yandex

चहा-कॉफी पिण्यासाठी योग्य वेळ

जेवण झाल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिण्याऐवजी किमान एक तास थांबावे. शरीरात आयर्नची कमतरता असल्यास दोन तासांचे अंतर ठेवणे अधिक चांगले.

Tea or Coffee | pinterest

पचनासाठी चहा चांगला की कॉफी?

जेवणानंतर चहा प्यावा की कॉफी, यापेक्षा दोन्ही पेये किती प्रमाणात पिता हे महत्त्वाचे आहे. जास्त चहा किंवा कॉफी प्यायल्याने त्रास होऊ शकतो. त्यामुळे जेवणानंतर साधे पाणी पिणे हा चांगला पर्याय आहे.

Tea or Coffee | Google

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Tea or Coffee

Diabetes Causes: साखर नाही, गोड पण खात नाही, तरीही तुमच्या रक्तातील साखर वाढते? डॉक्टरांनी सांगितले धक्कादायक कारण

Diabetes Causes | Saam Tv
येथे क्लिक करा