Shreya Maskar
मसाला चहा बनवण्यासाठी सुंठ, वेलची, काळी मिरी, दालचिनी, लवंग, जायफळ पावडर, तुळशीची पाने आणि बडीशेप इत्यादी साहित्य लागते.
मसाला चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम सुंठाचे छोटे तुकडे करून घ्या.
आता एका पॅनमध्ये सुंठ गरम करून घ्या.
पुन्हा दुसऱ्या पॅनमध्ये लवंग, काळी मिरी, वेलची, दालचिनी, तुळशीची पाने आणि बडीशेप घालून छान भाजून घ्या.
आता भाजलेले मसाले आणि सुंठ बारीक मिक्सरला वाटून घ्या.
या मिश्रणात जायफळ पावडर टाकून सर्व मिक्स करून घ्या.
मसाल्याची चव आणखी वाढवण्यासाठी तुम्ही यात केशरही टाकू शकता.
तयार केलेला मसाला एक चमचा चहा बनवताना टाका. चहाची चव वाढवेल.