Shreya Maskar
जेवताना तोंडी लावण्यासाठी दही प्याज बनवा.
दही प्याज बनवण्यासाठी तेल, दही, कांदा, टोमॅटो प्युरी इत्यादी पदार्थ लागतात.
जिरे, मोहरी, बडीशेप, मेथी दाणे, आलं, लसूण, हिरवी मिरची, धणे-जिरे पूड, गरम मसाला आणि लाल तिखट इत्यादी मसाले लागतात.
दही प्याज बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तेल घालून त्यात जिरे, मोहरी, मेथी दाणे, बडीशेप आणि आलं-लसूण-मिरची पेस्ट घालून परतून घ्या.
त्यानंतर टोमॅटो प्युरी, चवीनुसार मीठ आणि इतर सर्व पदार्थ टाकून छान मिक्स करा.
मिश्रण चांगले मिक्स झाल्यावर त्यात दही आणि चिरलेला कांदा घालून सर्व एकजीव करा.
एक वाफ आल्यावर त्यात कोथिंबीर मिक्स करा.
अशाप्रकारे चटपटीत दही प्याजची रेसिपी तयार झाली आहे.