Shreya Maskar
चहा मसाला पावडर बनवण्यासाठी वेलची, बडीशेप, काळी मिरी, लवंग, दालचिनी, जायफळ, सुंठ, चक्रफूल इत्यादी साहित्य लागते.
चहा मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम गॅस मंद आचेवर ठेवून त्यावर पॅन ठेवा.
पॅनमध्ये वेलची, बडीशेप, काळी मिरी, लवंग, दालचिनी, जायफळ, सुंठ, चक्रफूल हे सर्व मसाले भाजून घ्या.
मसाले थंड झाल्यावर मिक्सरमध्ये टाकून पावडर बनवा.
अशाप्रकारे चहा मसाला तयार झाला आहे.
घरी बनवलेला चहा मसाला एक ते दोन महिने तुम्ही वापरू शकता.
वेलची, दालचिनी आणि आले यांमुळे आपली पचनक्रिया सुधारते.
सर्दी आणि खोकल्यासाठी काळी मिरी आणि लवंग रामबाण उपाय आहे.