Tea: भारतात कशी झाली चहा पिण्याची सुरुवात जाणून घ्या हा रंजक इतिहास

Shruti Vilas Kadam

आंतरराष्ट्रीय चहा दिनाची सुरुवात


प्रत्येक वर्षी २१ मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा केला जातो. या दिनाचे उद्दिष्ट चहाच्या खपात वाढ करणे आणि त्याच्या उत्पादनाशी संबंधित लोकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे आहे.

Tea | Social Media

भारतामध्ये चहा पिण्याची सुरुवात


भारतामध्ये चहा पिण्याची सुरुवात १८३४ मध्ये झाली. त्यावेळी गव्हर्नर जनरल लॉर्ड बेंटिक यांनी आसाममध्ये काही लोकांना चहाच्या पानांचे उकळून औषध म्हणून सेवन करताना पाहिले.

Tea Snacks | SAAM TV

चहाचा इतिहास आणि चीनशी संबंध


चहाचा शोध ब्रिटनमध्ये नव्हे तर चीनमध्ये लागला होता. चीनमध्ये चहा अनेक शतकांपासून वापरात आहे आणि त्याचा इतिहास हजारो वर्षांचा आहे.

Tea | yandex

भारतामध्ये चहाचे उत्पादन


भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा चहा उत्पादक देश आहे. भारतात दरवर्षी सुमारे ८,३७,००० टन चहा सेवन केला जातो.

Tea | SAAM TV

चहा दिनाची थीम २०२५


२०२५ साली आंतरराष्ट्रीय चहा दिनाची थीम 'टी फॉर बेटर लाईव्ह्स' (Tea for Better Lives) अशी आहे. या थीमचा उद्देश चहा उत्पादनाशी संबंधित लोकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे आहे.

Tea | Saam Tv

चहाचे आरोग्यदायी फायदे


चहामध्ये प्रोटिन, पॉलीसॅकेराइड, पॉलिफेनॉल, मिनरल्स आणि अमिनो अॅसिड्स यांसारखे घटक असतात. हे घटक शरीरासाठी फायदेशीर असून, चहा अँटीऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे.

tea | canva

चहा आणि भारतीय संस्कृती


भारतात चहा फक्त एक पेय नसून, तो भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. दिवसाची सुरुवात, कामाच्या ब्रेक्स, मित्रमैत्रिणींसोबतच्या गप्पा अशा अनेक प्रसंगांमध्ये चहा आवश्यक मानला जातो.

Tea | Canva

Kurkure Recipe: लहान मुलांना आवडणारे टेस्टी कुरकुरे घरच्या घरीच ट्राय करा, वाचा 'ही' सोपी रेसिपी

Kurkure Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा