Manasvi Choudhary
नाश्त्याला चहा- बिस्किट आणि पोहे खाण्याची सवय अनेकांना असते. मात्र तुम्हाला माहितीये का? या दोन्ही पर्यायापैकी कोणते आरोग्यासाठी बेस्ट आहे.
सकाळी चहा- बिस्किट खाण्याची अनेकांना सवय असते मात्र चहा - बिस्किटचा आरोग्यावर कसा परिणाम होतो ते समजून घ्या.
बाजारात मिळणाऱ्या बिस्किटांमध्ये मैदा, साखरेचे प्रमाण अधिक असते यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्याची शक्यता अधिक असते.
जर तुम्ही रिकाम्या पोटी चहा-बिस्किटचे सेवन केले तर पोटात गॅस, जळजळ आणि ॲसिडिटीचा त्रास वाढतो. तसेच यामुळे शरीराला कोणतीही उर्जा मिळत नाही थकवा येतो आणि भूक लवकर लागते.
अनेकजण सकाळी नाश्त्याला पोहे खातात. पोहे हा नाश्त्यासाठी हेल्दी पर्याय आहे. पोहे पचायला सोपे असल्याने सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही खाऊ शकता. सकाळी शरीराची पचनक्रिया मंदावलेली असते अशावेळी तुम्ही पोहे खाऊ शकता
पोह्यांमध्ये शेंगदाणे, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घातल्यामुळे शरीराला लोह, व्हिटॅमिन्स आणि फायबर ही पोषकघटके मिळतात.
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही पोहे अत्यंत फायदेशीर आहे. पोहे खाल्ल्याने शरीरात एनर्जी टिकून राहते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.