Tea and Biscuit: तुम्हालाही चहा-बिस्कीट खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतात हे 7 परिणाम

Shruti Vilas Kadam

शरीराला पुरेसे पोषण मिळत नाही

चहा आणि बिस्कीटमध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे कमी प्रमाणात असतात. त्यामुळे दिवसाची सुरुवात आवश्यक पोषणांशिवाय होते.

Tea And Biscuits

रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते

बहुतेक बिस्कीटांमध्ये साखर आणि रिफाइंड मैदा असतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते आणि नंतर पटकन कमी होते.

Tea And Biscuits

लवकर भूक लागू शकते

चहा-बिस्कीट पोट भरल्यासारखे वाटते, पण त्यात दीर्घकाळ ऊर्जा देणारे घटक नसल्याने काही वेळातच पुन्हा भूक लागू शकते.

Tea And Biscuits | Social Media

वजन वाढण्याचा धोका

साखरयुक्त चहा आणि बिस्कीटांचे नियमित सेवन केल्यास अतिरिक्त कॅलरीज शरीरात जमा होतात, ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता वाढते.

Tea And Biscuits | Social Media

पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो

फायबरचा अभाव असल्याने बद्धकोष्ठता, अपचन किंवा पोट साफ न होण्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

Tea And Biscuits | Social Media

दिवसभर थकवा जाणवू शकतो

संतुलित नाश्ता न घेतल्यास शरीराला पुरेशी ऊर्जा मिळत नाही. परिणामी, काम करताना थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो.

Tea And Biscuits | Social Media

हृदयाच्या आरोग्यावर परिणाम

जास्त प्रमाणात साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्याने दीर्घकालीन काळात कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

Tea And Biscuits | Social Media

चांगला नाश्ता कोणता?

चहा-बिस्कीटऐवजी पोहे, उपमा, उकडलेली अंडी, फळे, ओट्स, मूग चिल्ला किंवा ड्रायफ्रूट्ससह दूध यांसारखे पौष्टिक पर्याय नाश्त्यात समाविष्ट केल्यास शरीराला अधिक ऊर्जा आणि पोषण मिळू शकते.

Tea And Biscuits | Social Media

Coffee Side Effect: रोज कॉफी पिण्याची सवय आहे? मग होऊ शकतात शरीराला हे 7 वाईट परिणाम

Coffee
येथे क्लिक करा