Shruti Vilas Kadam
कॉफीमध्ये असलेले कॅफीन मेंदूला सतर्क ठेवते. त्यामुळे संध्याकाळी किंवा रात्री कॉफी घेतल्यास झोप येण्यास उशीर होऊ शकतो आणि झोपेची गुणवत्ता कमी होऊ शकते.
अतिप्रमाणात कॉफी पिल्याने पोटातील आम्लाचे प्रमाण वाढू शकते. यामुळे अॅसिडिटी, छातीत जळजळ आणि पोटदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
जास्त कॅफीन घेतल्यास काही लोकांमध्ये हृदयाचे ठोके वेगाने धडधडणे किंवा अस्वस्थता जाणवू शकते.
कॅफीनचा अतिरेक केल्यास चिडचिड, बेचैनी, घाबरल्यासारखे वाटणे आणि चिंता वाढण्याची शक्यता असते.
काही व्यक्तींमध्ये कॉफीचे जास्त सेवन केल्याने तात्पुरता रक्तदाब वाढू शकतो. त्यामुळे उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी प्रमाणात कॉफी घ्यावी.
कॉफीचे जास्त सेवन केल्यास लघवीचे प्रमाण वाढू शकते. पुरेसे पाणी न घेतल्यास शरीरात डिहायड्रेशनची शक्यता निर्माण होऊ शकते.
कॉफीचे जास्त सेवन केल्यास लघवीचे प्रमाण वाढू शकते. पुरेसे पाणी न घेतल्यास शरीरात डिहायड्रेशनची शक्यता निर्माण होऊ शकते.
रोज खूप कॉफी पिण्याची सवय लागल्यास कॅफीनवर अवलंबित्व निर्माण होऊ शकते. कॉफी न मिळाल्यास डोकेदुखी, थकवा किंवा चिडचिड जाणवू शकते.