Tata Harrier: टाटा हॅरियर ईव्ही पूर्ण चार्ज केल्यानंतर किती अंतर धावू शकते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टाटा हॅरियर

टाटा मोटर्सने भारतीय बाजारात हॅरियर ईव्ही लाँच केली आहे. या कारमध्ये काय खास आहे आणि पूर्ण चार्जवर ती किती रेंज देते, जाणून घेऊयात.

tata | google

बॅटरी पॅक ऑप्शन

या कारची किंमत २१.४९ लाख रुपये (पॅन इंडिया एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. कंपनीने ही कार ६५ किलोवॅट प्रति तास आणि ७५ किलोवॅट तास बॅटरी पॅकसह लॉंच केली आहे.

tata | google

एकूण ३ प्रकार

अॅडव्हेंचर, फियरलेस आणि एम्पॉवर्ड या ३ प्रकारांमध्ये लाँच केलेली ही कार पूर्ण चार्ज केल्यावर ६२२ किलोमीटरची रेंज देते.

tata | google

पॉवर

ड्युअल मोटर ऑल-व्हील ड्राइव्ह फ्रंट मोटरसह १५८ पीएस (११६ किलोवॅट) आणि रिअर मोटर २३८ पीएस (१७५ किलोवॅट) पॉवर निर्माण करण्यास सक्षम आहे.

tata | google

ड्राइव्ह मोड

यामध्ये ऑल व्हील ड्राइव्ह पर्याय, रॉक क्रॉल मोड, ट्रान्सपरंट मोड आणि बूस्ट मोड सारखे ऑफरोडिंग मोडचा समावेश आहे.

tata | google

एलईडी डीआरएल

कंपनीने या कारमध्ये नवीन १९-इंच अलॉय व्हील्स आणि कनेक्टेड एलईडी डीआरएलसह वर्टिकल-स्टॅक्ड एलईडी हेडलाइट सेटअप दिला आहे. तसेच १०.२५-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि १४.५-इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील आहे.

tata | google

पॅनोरॅमिक सनरूफ

कारमध्ये रूफ रेल आणि पॅनोरॅमिक सनरूफ आहे आणि शार्क फिन अँटीनामध्ये कॅमेरा देखील देण्यात आला आहे. कारमध्ये ५०२ लिटरची बूट स्पेस आहे.

tata | google

NEXT: पावसाळ्यात ट्रेकिंगला जायचय? नैसर्गिक सौदर्याने नटलेल्या हरिश्चंद्रगडाला एकदा तरी भेट द्याच

harishchandragad | google
येथे क्लिक करा