Manasvi Choudhary
साऊथ इंडियन इडली आणि मेंदूवडा हे पदार्थ खायला सर्वांनाच आवडतात.
तुम्ही कधी साऊथ इंडियन सूजी इडली खाल्लीये का? सूजी इडली घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
सूजी इडली बनवण्यासाठी तुम्हाला रवा, दही, मीठ, बेकिंग सोडा, तेल, मोहरी, चणाडाळ, आलं, हिरवी मिरची, कढीपत्ता हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम गॅसवर पॅनमध्ये सूजी म्हणजेच रवा चांगला परतून घ्यायचा आहे.
भाजलेला रवा थंड करून घ्या नंतर एका बाऊलमध्ये दही आणि मीठ चांगले फेटून घ्या
संपूर्ण मिश्रणात पाणी घालून मिक्स करा. अशाप्रकारे पीठ तयार झाले आहे. मिश्रणात तेल मोहरी, चणाडाळ आणि कढीपत्ता याची फोडणी घाला.
नंतर गॅसवर इडली भांड्यात तेल लावून हे मिश्रण सोडा. मध्यम आचेवर १० ते १५ मिनिटे वाफवून घ्या. अशाप्रकारे सूजी इडली तयार आहे.