Shreya Maskar
पावसाळा आला की रानभाजीला बहर येतो. बाजारात अनेक रानभाज्या उपलब्ध होतात. त्यातील तरोटा ही भाजी आरोग्यालासाठी खूपच फायदेशीर आहे. तरोटा या भाजीला टाकळा देखील बोलतात.
तरोटा भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम तरोटा ही भाजी स्वच्छ धुवून त्याची पाने काढून घ्या. पावसाळ्यात पालेभाज्या धुवण्यासाठी कोमट पाणी वापरा.
त्यानंतर भाजीची पाने गरम पाण्यात ५ मिनिटे उकळवा. यामुळे भाजीतील सर्व कडवटपणा निघून जातो.
आता पॅनमध्ये थोडे तेल टाकून सर्व फोडणीचे पदार्थ टाकून २-३ मिनिटे परतून घ्या. त्यानंतर यात बारीक चिरलेला कांदा गोल्डन फ्राय करा.
त्यानंतर भाजीत हिरव्या मिरच्या, हळद, शेंगदाण्याचा कूट आणि आवडीचे थोडे मसाले टाकून मिक्स करा. त्यानंतर तरोटा भाजी त्यात शिजवून घ्या.
शेवटी चवीनुसार मीठ घालून भाजीला एक वाफ काढून घ्या. गरमागरम भाकरी आणि भाजीचा आस्वाद घ्या.
तरोटा या भाजीत प्रभावी बुरशीनाशक आणि विषनाशक गुणधर्म आहेत. याची पाने खाल्ल्याने किंवा पानांचा रस त्वचेवर लावल्याने त्वचेचा संसर्ग कमी होण्यास मदत मिळते.
तरोटा भाजीला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. हे बद्धकोष्ठतेपासून आराम देण्यास आणि पोटातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते, ज्यामुळे पावसाळ्यात जेव्हा पचनाच्या समस्या वारंवार वाढतात तेव्हा ही भाजी खा.