Palghar Tourism : समुद्रकिनारी उभा असलेला पालघरमधील 'हा' भव्य ऐतिहासिक किल्ला, देतोय मराठ्यांच्या शौर्याची साक्ष

Shreya Maskar

तारापूर किल्ला

तारापूर किल्ला महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यात, बोईसरजवळील तारापूर गावात स्थित आहे. हा पोर्तुगीजकालीन सागरी किल्ला मुंबईपासून सुमारे १०० किमी अंतरावर असून चिंचणी समुद्रकिनाऱ्याजवळ आहे.

Tarapur Fort | google

कसे जाल?

१६ व्या शतकातील तारापूर हा ऐतिहासिक सागरी किल्ला आहे. बोईसर रेल्वे स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षाने तारापूर किल्ल्याजवळ पोहचता येते.

How ​​to Get There | google

सागरी लष्करी तळ

तारापूर किल्ला ऐतिहासिक काळातील सागरी लष्करी तळ म्हणून प्रसिद्ध आहे. तारापूर किल्ला १७३९ मध्ये चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी जिंकून घेतला.

A Maritime Military Base | google

किल्ल्याची रचना

तारापूर किल्ल्याला गोलाकार बुरुज आणि प्राचीन विहिरी पाहायला मिळतात. किल्ल्याच्या भिंती जाड आहेत. किल्ल्यावरून निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

Fort's Architecture | google

चिंचणी समुद्रकिनारा

चिंचणी समुद्रकिनारा हे प्रामुख्याने आपल्या शांत वातावरणामुळे, स्वच्छ , गर्दीविरहित किनाऱ्यांमुळे आणि सोनेरी-रुपरी वाळूसाठी प्रसिद्ध आहे. येथून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

Beach | google

इतिहास

तारापूर किल्ल्यावर (Tarapur Fort) सर्वात महत्त्वाची ऐतिहासिक लढाई १७३९ मध्ये मराठा साम्राज्य आणि पोर्तुगीज वसाहतकारांमध्ये झाली होती.

History | google

पालघरमधील ऐतिहासिक ठिकाणे

पालघरमध्ये तारापूर किल्ल्यासोबतच वसईचा किल्ला, शिरपामाळ (जव्हार), केळवा किल्ला आणि अर्नाळा किल्ला यांचा समावेश आहे.

fort | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Palghar | google

NEXT : इतिहासातील महत्त्वाचे पान! प्राचीन लेण्यांनी सजलेला जालनामधील 'हा' किल्ला, उन्हाळी सुट्टीत करा भटकंती

Jalna Tourism | saam tv
येथे क्लिक करा...