Shreya Maskar
मुलांसोबत वीकेंडला फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर, तारापोरवाला मत्स्यालय बेस्ट लोकेशन आहे.
तारापोरवाला मत्स्यालय हे मुंबईतील प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे.
लहान मुलांना येथे खूप मजा येईल. रंगीबेरंगी मासे पाहायला मिळतील.
तारापोरवाला मत्स्यालय हे मुंबईतील मरीन ड्राइव्हवर चर्नी रोड रेल्वे स्थानकाजवळ आहे.
तारापोरवाला मत्स्यालयाला भेट दिल्यावर समुद्री आणि गोड्या पाण्यातील माशांच्या विविध प्रजाती पाहायला मिळतात.
लहान मुलांसोबत येथे आवर्जून जा. मुलांना सागरी जीवनाची जवळून ओळख करून देता येईल.
तारापोरवाला मत्स्यालयाच्या जवळ मरीन ड्राइव्ह आणि गिरगाव चौपाटी ही पर्यटन स्थळे आहेत.
तारापोरवाला मत्स्यालय हे भारतातील सर्वात जुने मत्स्यालय आहे.