Shruti Vilas Kadam
नळावर पांढरे डाग, साबणाचा थर किंवा गंज जमा झाला आहे का ते पाहा. डागांच्या प्रकारानुसार नळा स्वच्छ करा.
स्टिलच्या नळावरील हलके डाग काढण्यासाठी कापडावर थोडा लिंबाचा रस घेऊन स्वच्छ करा. त्यानंतर पाण्याने पुसून साफ करा.
क्रोम फिनिशच्या नळावर पाण्याचे डाग असल्यास व्हिनेगर आणि पाणी एकत्र मिसळा. आधी छोट्या भागावर वापरुन पाहा. त्यानंतर मऊ कापडाने स्वच्छ करा आणि लगेच पाण्याने धुऊन कोरडे करा.
बेकिंग सोड्यात थोडे पाणी घालून पातळ पेस्ट तयार करा. नळाच्या भागावर टेस्ट करा आणि मऊ कापडाने हलक्या हाताने स्वच्छ करा.
नळाच्या तळाशी, कोपऱ्यात आणि हँडलजवळ जमा झालेली घाण काढण्यासाठी मऊ ब्रिसल्स असलेला जुना टूथब्रश वापरा. जोरात घासणे किंवाै स्क्रबर वापरणे टाळा.
नळ स्वच्छ केल्यानंतर स्वच्छ पाण्याने पुसून घ्या. त्यानंतर कोरड्या मायक्रोफायबर कापडाने नळ पूर्णपणे कोरडा करा. यामुळे पाण्याचे नवीन डाग तयार होण्याची शक्यता कमी होते.
नळावर पाणी साचू देऊ नका. वापरानंतर ओलावा पुसून टाका आणि नियमितपणे सौम्य क्लीनरने स्वच्छता करा.