Mug Cleaning Tips: बाथरुममध्ये वापरला जाणारा मग किती दिवसांनी बदलावा? डाग काढण्यासाठी जाणून घ्या सोप्या टिप्स

Shruti Vilas Kadam

आठवड्यातून एक ते दोन वेळा स्वच्छ करा

बाथरुममध्ये वापरला जाणारा मग आठवड्यातून किमान एक ते दोन वेळा साबण किंवा योग्य क्लीनरच्या मदतीने स्वच्छ करा. मगवर डाग किंवा दुर्गंधी असल्यास लगेच साफ करा.

Mug Cleaning Tips

बेकिंग सोड्याचा वापर करा

मगवर हलके डाग किंवा साबणाचा थर जमा झाला असेल तर, तो ओला करून त्यावर थोडा बेकिंग सोडा टाका. मऊ ब्रशने घासून स्वच्छ पाण्याने धुवा.

Mug Cleaning Tips

प्रत्येक वापरानंतर मग धुवा

मग वापरल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यामुळे त्यावर साबणाचा थर आणि पाण्याचे डाग लवकर जमा होत नाहीत.

Mug Cleaning Tips

मग कोरड्या जागी ठेवा

मग धुतल्यानंतर त्यातील पाणी पूर्णपणे निथळू द्या. शक्यतो हवेशीर ठिकाणी ठेवा, जेणेकरून सतत ओलावा राहून मग खराब होणार नाही.

Mug Cleaning Tips

क्लीनर वापरताना काळजी घ्या

मग धुताना चांगले क्लीनर वापरा. ब्लीचसोबत इतर क्लीनर मिसळल्याने विषारी वायू तयार होऊ शकतात.

Mug Cleaning Tips

मग खराब झाल्यास बदला

मगला तडा गेला असेल, किंवा तो जास्तच खराब झाला असले तर तो वेळेवर बदला. मग नेहमी त्याच्या स्थिती आणि वापरानुसार कधी बदलायचं ते ठरवा.

Mug Cleaning Tips

टॉयलेट स्वच्छ करण्याच्या ब्रशपासून वेगळा ठेवा

मग आणि कमोड साफ करण्यासाठी वापरला जाणारा ब्रश एकाच ठिकाणी ठेवू नका. मग नियमित धुवा, कोरडा ठेवा.

Mug Cleaning Tips

Rice vs Roti: भात की चपाती? वजन कमी करण्यासाठी रात्री जेवताना काय खावं

Rice vs Roti | Saam Tv
येथे क्लिक करा