Rice vs Roti: भात की चपाती? वजन कमी करण्यासाठी रात्री जेवताना काय खावं

Shruti Vilas Kadam

भात आणि चपाती दोन्ही पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही

वजन कमी करताना भात किंवा चपाती यापैकी एकच पदार्थ खावा असं आवश्यक नाही. प्रमाण आणि संपूर्ण आहार याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे.

rice or roti | saam tv

भातामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात

भात हा कार्बोहायड्रेट्सचा स्रोत आहे. रात्री भात खायचा असल्यास त्याचं प्रमाण नियंत्रित ठेवणं आणि त्यासोबत भाजी, डाळ किंवा प्रथिनांचा स्रोत घेणं उपयुक्त ठरू शकतं.

Chole Rice | pinterest

चपातीमध्ये फायबरचा फायदा मिळू शकतो

गव्हापासून बनवलेली चपाती आहारात फायबर देऊ शकते. त्यामुळे योग्य प्रमाणात चपाती हा डिनरसाठी पर्याय असू शकतो.

roti | yandex

वजन कमी करण्यासाठी प्रमाण महत्त्वाचं

फक्त भात किंवा चपाती खाणं टाळण्यापेक्षा किती प्रमाणात खात आहोत हे अधिक महत्त्वाचं आहे. जास्त कॅलरी सेवन झाल्यास वजन कमी करण्याच्या उद्दिष्टावर परिणाम होऊ शकतो.

Rice | yandex

डिनरमध्ये भाज्यांचा समावेश करा

वजन नियंत्रणासाठी रात्रीच्या जेवणात भरपूर भाज्या, सॅलड किंवा इतर पौष्टिक पदार्थांचा समावेश करता येतो. यामुळे जेवण अधिक संतुलित ठेवण्यास मदत होते.

Dal-Roti | yandex

प्रोटीन महत्त्वाचे

डिनरमध्ये डाळी, कडधान्ये, पनीर, दही, अंडी किंवा इतर योग्य प्रोटीन स्रोत समाविष्ट केल्यास आहार अधिक संतुलित होऊ शकतो.

Chapati-Roti

Pooja Birari: बांदेकरांच्या सुनबाईंचा मराठमोळा थाट! गुलाबी नऊवारीत पूजा बिरारीचा खुलला लूक

Pooja Birari | Saam Tv
येथे क्लिक करा