Manasvi Choudhary
तांदळाची भाकरी आणि झणझणीत ठेचा खायला सर्वांनाच आवडतो.
तांदळाची भाकरी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
तांदळाची भाकरी बनवण्यासाठी तांदळाचे पीठ, पाणी, मीठ हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम गॅसवर एका भांड्यात पाणी उकळत ठेवा.
परातीमध्ये तांदळाचे पीठ घ्या आणि त्यामध्ये उकळलेले पाणी घाला.
नंतर पीठ चागले मळून घ्या मग त्याचे लहान लहान गोळे करा.
पोळपाटावर त्याची भाकरी लाटून गॅसवर गरम तव्यावर टाका.
त्यावर थोडा हात फिरवा. नंतर ती भाकरी उलटवून दोन्ही बाजूंनी शेकवून घ्या.
अशाप्रकारे तांदळाची भाकरी ठेचा, चटणी खाण्यासाठी तयार आहे.