Siddhi Hande
तांदळाची भाकर ही अनेकदा कडक होते. पीठ मळताना किंवा थापताना काही झालं की भाकर ही कडक होतेच.
तांदळाची भाकर उकड घेऊन करतात तेव्हा ती मऊसूत होते. परंतु अनेकदा उकड काढण्याचा कंटाळा येतो.
तुम्ही कोणतीही उकड न काढता, भाकरी न थापत मऊ लुसलुशीत भाकर बनवू शकतात.
सर्वात आधी भाकरीचं पीठ गरम पाण्यात मळून घ्यावे.
तुम्ही पाणी गरम करा. त्यात थोड मीठ टाका. हेच पाणी पीठात टाकून मळून घ्या.
यानंतर पीठावर ५ मिनिट झाकण ठेवा.
यानंतर तुम्ही ही भाकरी लाटू शकतात. या भाकरीला भेगा पडणार नाही.
भाकर भाजण्याआधी तवा गरम करण्याआधीच त्यावर थेंबभर तेल लावा.
यानंतर भाकरी तव्यावर टाकून दोन्ही बाजूने घ्या.
अशा पद्धतीने तुम्ही भाकर केली तर तुमची भाकर कधीच कडक होणार नाही.