Tamarind Benefits For Glowing Skin: ग्लोईंग स्किनसाठी चिंचेचा फेसपॅक ठरेल फायदेशीर; असा बनवा घरच्या घरी

Manasvi Choudhary

चिंच

चिंच ही केवळ पदार्थांची चव वाढवण्यासाठीच नाही, तर आपल्या त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठीही अत्यंत गुणकारी मानली जाते.

Tamarind | yandex

चिंचाचे फायदे वाचा

चिंच नैसर्गिकरित्या हायड्रॉक्सी ॲसिडयुक्त असते, जी त्वचेसाठी एक उत्कृष्ट नॅचरल एक्सफोलिएटर म्हणून काम करते. यामुळे त्वचेवरील मृत पेशी आणि टॅनिंग निघून जाण्यास मदत होते.

Tamarind Benefits For Glowing Skin

बेसन आणि हळदीमध्ये चिंच मिक्स करा

चिंचेचा गर काढून त्यात एक चमचा बेसन आणि चिमूटभर हळद मिसळून पेस्ट तयार करा. हा पॅक चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवरील मळ आणि डेड स्किन निघून जाते, तसेच त्वचेला नैसर्गिक उजळपणा मिळतो.

Tamarind Benefits For Glowing Skin | pinterest

दही आणि चिंचेचा फेस पॅक

चिंचेच्या गरमध्ये घट्ट दही मिसळून चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. दही त्वचेला ओलावा देते आणि चिंचेतील ॲसिडमुळे त्वचा उजळ आणि स्वच्छ होण्यास मदत होते.

Curd

मध आणि चिंच

चिंचेच्या गरमध्ये शुद्ध मध मिसळून चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. मधाच्या अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे त्वचा मऊ, मुलायम आणि हायड्रेट राहते, तसेच चेहऱ्यावरील डाग कमी होतात.

Tamarind Benefits For Glowing Skin | saam tv

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT: Private Part Hygiene Tips: प्रायव्हेट पार्टच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका! ‘या’ ५ गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या

Private Part Hygiene Tips
येथे क्लिक करा...