Sakshi Sunil Jadhav
उंची जास्त असलेल्या महिलांवर साडी विशेष उठून दिसते. मात्र अनेक महिलांना साडी नेसण्याची योग्य पद्धत, रंग आणि फॅब्रिकची निवड कशी करावी, याबाबत संभ्रम असतो. पुढे आपण योग्य साडी, ब्लाउज आणि ड्रॅपिंग स्टाइलबद्दल जाणून घेणार आहोत.
उंच आणि सडपातळ महिलांनी साडीमध्ये कशी दिसेन याची काळजी करण्याची गरज नाही. योग्य साडी आणि योग्य स्टाइल केल्याने साडीतला लूक खूपच ग्रेसफुल दिसतो.
पेस्टल, व्हाईट आणि हलके रंग शांत व एलिगंट लूक देतात, तर डार्क आणि बोल्ड रंग स्टनिंग व कॉन्फिडंट वाइब्स देतात. तुमच्या स्किन टोननुसार रंग निवडणं फायदेशीर ठरेल.
लहान डिझाइन्सपेक्षा तुलनेत उंच महिलांवर मोठे प्रिंट्स, ब्रॉड बॉर्डर आणि डिझायनर पॅटर्न जास्त आकर्षक दिसतात.
शरीराला योग्य वॉल्यूम देण्यासाठी हेवी एम्ब्रॉयडरी, क्रिस्टल एम्बेलिश्ड किंवा रेशमी साड्या निवडल्या पाहिजेत. बनारसी आणि कोटा साड्या उंच महिलांवर जास्त खुलून दिसतात.
कॉटन, जूट, सिल्क, हेवी जॉर्जेटसारखे फॅब्रिक कर्व्ह्सना चांगला शेप देतात. शिफॉन किंवा साटनसारखे खूप चिकट फॅब्रिक टाळा.
प्लीट्स नीट, स्वच्छ आणि परफेक्ट ठेवा. हेवी लूकसाठी छोट्या आणि जास्त प्लीट्स करा. साडी नाभीच्या थोडी खाली नेसल्याने लूक जास्त बॅलन्स्ड दिसतो.
पदर फ्लोई ठेवू शकता किंवा त्यात प्लीट्स करून मॉडर्न टच देऊ शकता. नीट पदर स्टाइल साडीचा संपूर्ण लूक बदलू शकतो.