ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जर बाहेर तुम्ही गेलात मात्र मुसळधार पाऊस पडत आहे तर अशा पावसात बाईक चालवणे टाळावे.
जर बाईक चालवताना पाऊस पडण्यास सुरुवात झाली तर काही वेळासाठी थांबावे आणि जिथे पावसापासून बचाव होईल त्या जागी थांबा.
अनेकदा काही महत्त्वाच्या कामासाठी व्यक्तीला बाईक चालवावे लागते. मात्र जर अशी घाई असल्यास अत्यंत हळुवार बाईक चालवावी.
पावसाळा सुरु होण्याआधीच तुम्ही बाईकचे टायर तपासुन घेणे.
पावसाळ्यात बाईक चालवताना हेल्मेटचा अवश्य वापर करावा.
पावसाळ्यात बाईक चालवताना तुम्ही रेनकोट सोबत ठेवावा.
मुसळधार पाऊस पडत असताना अनेकदा काळोख होतो. त्यामुळे पावसाळ्यात बाईक चालवताना बाईकच्या हेडलाईट योग्य काम करत आहेत का तपासाव्यात.