ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिवाळ्यात केस ड्राय होतात त्यामुळे केस धुवायच्या एक तास अगोदर तेल लावावे. यामुळे केस ड्राय होणार नाही.
योग्य शॅम्पूची निवड करा. जेणेकरूण स्कॅल्प मॅाइश्चयराइज राहील आणि केस ड्राय होणार नाही.
हिवाळ्यात अधिक थंड किंवा अधिक गरम पाण्याने डोक धुवू नये. त्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा.
केसांमध्ये शॅम्पू लावायच्या अगोदर केस पूर्णपणे पाण्याने धुवून घ्या यामुळे शॅम्पू केसांमध्ये व्यवस्थितरित्या लागेल.
अधिक प्रमाणात शॅम्पू वापरु नये. केसाच्या लांबीप्रमाणे शॅम्पूचे प्रमाण असावे. अन्यथा केस ड्राय होतात.
शॅम्पू लावताना त्याला स्कॅल्पवर सर्क्युलर मोशनमध्ये लावावे. यामुळे केसातली घाण निघून जाते.
यानंतर केसांना कंडीशनर लावा कंडीशनर केसांना सॅाफ्ट ठेवतो. यामुळे हिवाळ्यात केस मॅाइश्चराइज राहतात.
केस धुतल्यानंतर केसांना मोकळे सोडा आणि सुकू द्या. केस ओले असताना ब्लो ड्राय किंवा हेअर ड्रायने करणे टाळा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: लोकांचा इंटरेस्ट कशात आहे? २०२४ मध्ये गुगलवर सर्वात जास्त काय सर्च केलं, लिस्ट पाहा