ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वर्षाच्या अखेर गुगलने मोस्ट सर्च म्हणजेच सर्वाधिक काय सर्च करण्यात आलं याची लिस्ट जाहीर केली आहे.
२०२४ मध्ये आयपीएल आणि टी- २० वर्ल्ड कप गुगलच्या सर्च लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत.
लोकसभा निवडणुकीचा निकाल जाणून घेण्यासाठी अनेकांनी गुगल सर्च केले. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाबाबत जाणून घेण्यासाठीही लोकांनी उत्सुकता दाखवली.
आगामी ऑलम्पिक स्पर्धेबाबतही गुगलवर सर्च करण्यात आले. यावेळी स्पर्धेबाबातची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
स्त्री-२, कल्कि 2898AD, 12 th फेल, लापता लेडीज, महाराजा, मंजुमेल बॅाइज, द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम आणि सालार सारख्या सिनेमांना गुगलवर सर्वाधिक सर्च केले.
हिरामंडी, मिर्जापूर, द लास्ट ऑफ अस, बिग बॅास १७ आणि पंचायत सारखे सुपरहीट वेब शो देखील गुगलवर सर्च करण्यात आले.
फिरण्यासाठी अजरबाइजान, कजाकिस्तान, मलेशिया, बाली, जयपूर , कश्मीर,मनाली, जॅार्जिया, दक्षिण गोवा, अयोध्या सारख्या ठिकाणांना सर्वाधिक सर्च करण्यात आले.
त्याचप्रमाणे खाण्यापिण्याशी संबधित गोष्टीह देखील गुगलवर अधिक सर्च करण्यात आले.
NEXT: शगुनमध्ये ११ रुपये दिले जातात; या एक रुपयाच्या नाण्याचं महत्व काय?