Taj Mahal: ताजमहाल बांधण्यासाठी किती वर्षे लागली? 'ताजमहाल' या चित्रपटाच्या वादामुळे पुन्हा प्रश्न उपस्थित

Shruti Vilas Kadam

बांधकामाची सुरुवात


मुघल सम्राट शाहजहान यांनी आपल्या प्रिय पत्नी मुमताज महलच्या स्मरणार्थ १६३१ साली ताजमहल बांधण्याचा निर्णय घेतला.

Taj Mahal

कालावधी आणि पूर्णता


या भव्य स्मारकाचे बांधकाम सुमारे २२ वर्षे चालले. मुख्य स्मारक १६४८ मध्ये पूर्ण झाले, तर संपूर्ण संकुल १६५३ मध्ये पूर्णत्वास आले.

taj mahal

कामगारांची संख्या


सुमारे २०,००० पेक्षा अधिक कारागीर आणि मजूर भारत, पर्शिया, तुर्कस्तान आणि मध्य आशियातून आणण्यात आले होते.

Taj Mahal

वापरलेले साहित्य


ताजमहलसाठी राजस्थानी मकराणा येथील पांढरा संगमरवर, तसेच लाल दगड, मौल्यवान रत्ने आणि सोन्याचे काम वापरले गेले.

Taj Mahal

वास्तुकलेचा संगम


या स्मारकात भारतीय, पर्शियन आणि इस्लामी वास्तुकलेचा उत्कृष्ट संगम पाहायला मिळतो. चारही बाजूंच्या मिनार आणि सममितीपूर्ण रचना त्याचे सौंदर्य वाढवतात.

Taj Mahal | saam tv

खर्च आणि कारागिरी


त्या काळात ताजमहलच्या बांधकामावर सुमारे ३२ लाख रुपयांचा खर्च आला होता, जो आजच्या काळात अब्जावधी रुपयांच्या बरोबरीचा आहे.

Taj Mahal

जागतिक वारसा स्थळ


ताजमहलला १९८३ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली. आज ते जगातील सात आश्चर्यांपैकी एक मानले जाते आणि भारताच्या वैभवाचे प्रतीक ठरले आहे.

Taj Mahal

Parineeti Chopra Birthday: राघव चठ्ठा आणि परिणीती चोप्रा कोण जास्त श्रीमंत? जाणून घ्या अभिनेत्रीची नेटवर्थ

Parineeti Chopra Raghav Chadha
येथे क्लिक करा