ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ताजमहल जगातल्या ७ आश्चर्यांपैकी एक आहे. ताजमहलला पाहण्यासाठी लाखो पर्यटक जगभरातून येथे येतात.
ताजमहलला संगमरवरी म्हणजेच मार्बलच्या दगडांनी बनवले आहे. याच्या देखरेखीची जबाबदारी भारतीय पुरातत्व विभागाकडे आहे.
393 वर्ष जुने ताजमहलला आजच्या काळातही चमकदार ठेवण्यासाठी कशाप्रकारे साफसफाई केली जाते, जाणून घ्या.
ताजमहलच्या सफाईसाठी खास मड पॅकिंग पद्धत वापरली जाते. यामध्ये विशेष मातीचा उपयोग केला जातो.
ताजमहलच्या सफाईसाठी मुलतानी मातीचा वापर केला जातो.
मुलतानी मातीमध्ये अॅल्युमिनिअम, फिलोसिलिकेट आणि मॅग्नेशियम असते. सफेद दगडांना किंवा मार्बलला साफ करण्यासाठी मुलतानी मातीचा वापर केला जातो.
ताजमहलला साफ करण्यासाठी मुलतानी मातीचा पेस्ट तयार केला जातो. आणि सफाई कर्मचारी पाणी शिंपडून ब्रशने हा पेस्ट लावला जातो.
पेस्ट सुकल्यानंतर पाणीने साफ केले जाते. ताजमहल साफ करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेला ३ ते ४ महिन्याचा कालावधी लागतो. वर्षातून दोनवेळा ताजमहलची सफाई केली जाते.