ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकांचं स्वप्न असतं की ताज हॉटेलमध्ये यावं. अथल्या शाही आदरातिथ्य जगभरातील लोकांना आकर्षित करते.
इंटरनेटवर अनेक वेळा लोक विचारतात की ताज हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी त्यांना किती किंमत मोजावी लागेल.
काही काळापूर्वी Quora वर एका व्यक्तीने ताज हॉटेलमध्ये दोन लोकांसाठी जेवणाची किंमत किती असेल असे विचारले तेव्हा त्याला अनेक उत्तरं मिळाली.
एका व्यक्तीने सांगितले की, मसाला क्राफ्ट नावाच्या इन-हाऊस रेस्टॉरंटमध्ये ज्यूस, स्नॅक्स, चिकन डिश, बटर नान, भात, देसी कबाब आणि गुलाब जामुनचा आस्वाद घेतला. दोन जणांच्या या जेवणाचे बिल सुमारे ७,००० रुपये होते.
रेडिटवर एका युजरने प्रश्न विचारला असता त्याला सांगितलं की, हाय टी दरम्यान एका व्यक्तीसाठी बुफेचा खर्च ३,००० रुपये आहे. अशा प्रकारे, ते ६,००० रुपयांमध्ये अनेक पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.
एका युझरच्या मते, हे बिल १०-१२ हजारांपर्यंत देखील पोहोचू शकते.
एकंदरीत जर या सर्व गोष्टी विचार केला तर ताज हॉटेलमध्ये आठ हजारांपर्यंत दोन लोकांच्या जेवणाचं बिल होऊ शकतं.