Tadgola Benefits : वजन कमी अन्..., ताडगोळ्याचे 'हे' ५ आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहितीये का?

Shreya Maskar

ताडगोळे

ताडगोळ्यातील कर्बोदके आणि कॅल्शियम यांसारखी आवश्यक पोषक तत्त्वे या फळाला आरोग्यदायी बनवतात. या कमी-कॅलरीजच्या फळात फायबर, प्रथिने आणि जीवनसत्त्वे सी, ए, ई, आणि के देखील असतात.

Tadgola | pinterest

शरीर हायड्रेट राहते

कडक उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे असते, कारण उन्हामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. अशा परिस्थितीत, आइस ॲपल शरीराला थंडावा देतात आणि त्यांचे सेवन केल्याने नैसर्गिकरित्या डिहायड्रेशनचा सामना करण्यास मदत होते.

Body Hydrated | pinterest

इतर नावे

ताडगोळे या फळाला आइस ॲपल असेही म्हणतात. उन्हाळ्यात हे फळ बाजारात येते आणि मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते.

Other Names | pinterest

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

ताडगोळे खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवते. कारण यात जीवनसत्त्वे, खनिजे असतात. आइस ॲपल हे पौष्टिक फळ आहे. कारण ते जीवनसत्त्वांनी समृद्ध आहे. हे फळ खाल्ल्याने तुम्ही खूप वेळ उत्साही राहता, तुम्हाला ऊर्जा मिळते.

Boosts Immunity | pinterest

पचनाच्या समस्या

आइस ॲपल ॲसिडिटी, पोटातील अल्सर, छातीत जळजळ आणि इतर अनेक पोटाच्या समस्या कमी करण्यास मदत करतात. तसेच ते पोटाला थंडावा देते.

Digestive Health | pinterest

वजन कमी

ताडगोळ्यांचा तुमच्या डाएटमध्ये समावेश करा. त्यातील पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे तुमचे पोट बराच वेळ भरलेले राहते आणि तुम्हाला भूक लागत नाही. शिवाय, त्यात कॅलरीज खूप कमी असतात.

Weight Loss | pinterest

त्वचेचे आरोग्य

त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी ताडगोळे खूप फायदेशीर ठरतात. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स, पुरळ, लाल चट्टे कमी होतात.

Skin | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

disclaimer | pinterest

NEXT : उन्हाळ्यात त्वचेसाठी वरदान आहे 'हे' फळ; आठवड्यातून एकदा तरी खा, पार्लरशिवाय मिळेल चमकदार त्वचा

Summer Skin Care | saam tv
येथे क्लिक करा...