Shreya Maskar
उन्हाळ्यात ताडगोळा हे फळ बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. उन्हाळ्यात न विसरता आठवड्यातून १-२ याचे नक्की सेवन करा. यामुळे शरीर आणि त्वचा हायड्रेट राहते.
ताडगोळा मध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असल्याने त्वचा हायड्रेट राहते आणि त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. त्यामुळे उन्हाळ्यात ताडगोळा नक्की खा.
ताडगोळामधील थंड गुणधर्म आणि अँटीऑक्सिडंट्स पिंपल्स कमी करण्यास मदत करतात. तसेच यामुळे उन्हाळ्यात चेहऱ्यावर येणारे काळे डागही निघून जातात. चेहऱ्याची जळजळ होत नाही.
ताडगोळा त्वचेचे वृद्धत्व कमी करते. ताडगोळ्यातील अँटीऑक्सिडंट्समुळे सुरकुत्या आणि चेहऱ्यावरील बारीक रेषा कमी होण्यास मदत होते.
त्वचेच्या खराब पेशी दुरुस्त करून नवीन पेशी तयार करण्यात ताडगोळा मदत करतो. याचा थंडावा शरीराला फ्रेश करतो.
ताडगोळामधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला प्रदूषण आणि सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण देतो. ताडगोळा नियमित खाल्ल्याने त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार आणि निरोगी दिसते.
ताडगोळ्यातील नैसर्गिक घटक त्वचेला आतून पोषण देतात, त्यामुळे त्वचा मऊ आणि गुळगुळीत होते. ताडगोळा शरीरातील उष्णता कमी करून त्वचेला थंडावा देतो.
ताडगोळा या रसरशीत फळात पाण्याचे प्रमाण जास्त असते , ज्यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास, पचन सुधारण्यास आणि डिहायड्रेशन टाळण्यास मदत मिळते.