Summer Sharbat Recipe : नारळ पाणीला टक्कर; उन्हाळ्यात प्या 'या' फळाचे थंडगार सरबत, वाचा सोपी रेसिपी

Shreya Maskar

उन्हाळ्यातील ताजेतवाने करणारे पेय

उन्हाळ्यात नारळला ताडगोळा हे फळ चांगले टक्कर देते. कडक उन्हातून घरी आल्यावर एक ग्लास ताडगोळा सरबत प्यायल्याने पोटाला थंडावा मिळेल.

Coconut Water | pinterest

ताडगोळा सरबत

ताडगोळा सरबत बनवण्यासाठी ताडगोळा, पाणी, लिंबाचा रस, साखर किंवा गूळ, पुदिन्याची पाने, काळे मीठ आणि बर्फाचे तुकडे इत्यादी साहित्य लागते.

Tadgola Sharbat | pinterest

ताडगोळा धुवा

ताडगोळा शरबत बनवण्यासाठी सर्वप्रथम ताडगोळ्याची तपकिरी साल काढून तो स्वच्छ धुवा. त्यानंतर ताडगोळ्याचे लहान तुकडे करून मिक्सरमध्ये वाटून घ्या.

Wash the Tadgola | pinterest

साखर

आता मिक्सरच्या भांड्यात मॅश केलेला ताडगोळा एका बाउलमध्ये काढा. त्यात साखर, लिंबाचा रस, पुदिन्याची पाने, काळे मीठ आणि बर्फाचे तुकडे घालून चांगले एकत्र करा.

Sugar | pinterest

पाणी

सरबतात थोडे थंड पाणी घालून मिश्रण गुळगुळीत होईपर्यंत चांगले ब्लेंड करा, जेणेकरून ताडगोळा सरबतची चव आणखी वाढेल.

Water | pinterest

बर्फ

तयार ताडगोळा सरबत एका ग्लासात ओता त्यावर बर्फाचे तुकडे टाका आणि थंडगार सर्व्ह करा. एक घोट पिताच तुम्ही रिफ्रेश व्हाल.

Ice | pinterest

टीप

तुम्ही ताडगोळा सरबत नॉर्मल पाण्यात बनवण्याऐवजी नारळाचे पाण्यातही बनवू शकता. यामुळे सरबतातील पोषक घटक वाढतील. चव वाढवण्यासाठी तुम्ही भिजवलेल्या तुळशीच्या बिया देखील घालू शकता.

Note | pinterest

फायदे

ताडगोळा फळातील नैसर्गिक साखरेमुळे थकवा दूर होऊन शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. ताडगोळ्यामध्ये व्हिटॅमिन-सी, खनिजे, पोटॅशियम आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि डिहायड्रेशन दूर होते.

Benefits | pinterest

NEXT : महिन्याभरात वजन कमी करायचंय? प्रोटीनने भरलेले 'हे' सँडविच नाश्त्याला खा

Weight Loss Recipe | saam tv
येथे क्लिक करा...