Tadgola Ice Cream Recipe : बाजारातील आईस्क्रीमला करा टाटा, बाय बाय; घरीच बनवा गारेगार ताडगोळा Ice Cream

Shreya Maskar

उन्हाळा

उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही बाजारातील आईस्क्रीम खाण्यापेक्षा घरीच ताडगोळ्याचा थंडगार आईस्क्रीम बनवा. रेसिपी आताच नोट करा.

Summer | pinterest

ताडगोळा फायदे

ताडगोळामध्ये अनेक पोषक घटक असतात. जे शरीराला हायड्रेट करतात. पचनशक्ती सुधारते. वजन नियंत्रणात राहते. त्वचेच्या समस्या होत नाही.

Benefits of Tadgola | pinterest

ताडगोळा आईस्क्रीम

ताडगोळा आईस्क्रीम बनवण्यासाठी ताडगोळा, व्हिपिंग क्रीम, कंडेंस्ड मिल्क, नारळाचे दूध, व्हॅनिला इसेन्स, मिल्क पावडर आणि सुकामेवा इत्यादी साहित्य लागते.

Tadgola | pinterest

ताडगोळा

ताडगोळा आईस्क्रीम बनवण्यासाठी सर्वप्रथम ताडगोळ्याचे साल काढून त्याते तुकडे करा. हे तुकडे ब्लेंडरमध्ये टाकून एक गुळगुळीत पल्प बनवा.

Tadgola | pinterest

व्हिपिंग क्रीम

नंतर टेक्स्चर देण्यासाठी २-३ तुकडे बारीक चिरून बाजूला ठेवा. एका मोठ्या बाउलमध्ये थंड व्हिपिंग क्रीम फेटून घ्या.

Whipping Cream | pinterest

कंडेंस्ड मिल्क

व्हीप्ड क्रीममध्ये कंडेंस्ड मिल्क आणि नारळाचे दूध घालून चांगले एकजीव करून घ्या. यात तयार केलेला ताडगोळ्याचा गर आणि बारीक चिरलेले तुकडे मिक्स करा.

Condensed Milk | pinterest

सुकामेवा

शेवटी या मिश्रणात मिल्क पावडर आणि ड्रायफ्रूट्सचे बारीक तुकडे करून टाका. जेणेकरून आईस्क्रीमला आणखी छान चव येईल.

Dry Fruits | pinterest

बर्फाचे खडे

मिश्रण एका हवाबंद डब्यात भरा, बर्फाचे खडे तयार होऊ नयेत म्हणून डबा क्लिंग रॅप सील करा. आईस्क्रीम सेट होण्यासाठी १०-१२ तास फ्रिझरमध्ये ठेवा.

Ice | pinterest

NEXT : ना डाएट, ना औषधं; सकाळी रिकाम्या पोटी प्या 'हे' ड्रिंक, ७ दिवसांत वजनात दिसेल फरक

Weight Loss | pinterest
येथे क्लिक करा...