Manasvi Choudhary
मे महिन्याच्या कडाक्याच्या उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. उन्हाळ्या ताक, लस्सी या थंड पेयांचे सेवन केले जाते.
ताक आणि लस्सी दोन्ही पेय दहीपासून बनवलेले जातात. उष्मघातापासून बचाव होण्यासाठी उन्हाळ्यात ताक की लस्सी, नेमके कोणते ड्रिंक प्यावे हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
ताकमध्ये कॅलरीज खूप कमी असतात त्यात पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने तुम्ही ताक पिऊ शकता.
ताकातील प्रोबायोटिक्स हे गुणधर्म पोटाला थंडावा देतात. शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करतात.
उन्हाळ्यात उष्मघातापासून बचाव होण्यासाठी तुम्ही ताकाचे सेवन करणे फायदेशीर असेल.
लस्सी ताकापेक्षा घट्ट असते. त्यात दह्याचे प्रमाण अधिक असल्याने शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते.
लस्सी शरीरातील साखरेचे प्रमाण वाढवण्यास मदत करते तसेच वजन कमी करण्यासाठी तुम्ही लस्सी पिऊ शकता.
पचनक्रिया सुधारण्यासाठी तुम्ही लस्सीपेक्षा ताकाचे सेवन करणे फायदेशीर असेल. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी कमी होते तेव्हा तुम्ही ताकचे सेवन करू शकता.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.