व्हिटॅमिनच्या कमतरतेची लक्षणं पायांमध्ये दिसतात; 'ही' लक्षणं वेळीच ओळखा

Surabhi Jayashree Jagdish

व्हिटॅमीन कमतरता

डॉक्टरांचे म्हणणे आहे की व्हिटॅमीनच्या कमतरतेचे सुरुवातीचे संकेत अनेकदा पायांमध्येच दिसून येतात. शरीरात काही बदल सुरू होताच त्याचा परिणाम पायांवर जाणवतो. त्यामुळे पायांतील लक्षणांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.

लक्षणं

‘जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूरोलॉजी’मध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, पायांमध्ये झिणझिण्या किंवा सुन्नपणा जाणवणं ही विटामिन बी१२ आणि बी६च्या कमतरतेमुळे होणारी समस्या असू शकते.

पाय वारंवार थंड पडणं

जर तुमचे पाय वारंवार थंड राहत असतील, सूज येत असेल किंवा दुखत असतील, तर हे लक्षण दुर्लक्षित करू नये. अशा लक्षणांमागे व्हिटॅमीनची कमतरता असू शकते. त्यामुळे वेळेवर योग्य निदान करणे गरजेचे आहे.

जळजळ

पायांमध्ये होणारी जलन व्हिटॅमीन बी१२ किंवा बी६च्या कमतरतेमुळे होऊ शकते. ही लक्षणे ‘पेरिफेरल न्यूरोपॅथी’ नावाच्या समस्येचे संकेत असतात. चुकीचा आहार किंवा मद्यपान यामुळे ही समस्या अधिक तीव्र होऊ शकते.

थंड किंवा फिकट पिवळसर पाय

जर तुमचे पाय थंड किंवा पिवळसर दिसत असतील, तर हे आयर्न किंवा व्हिटॅमीन बी१२च्या कमतरतेमुळे होऊ शकते. हीमोग्लोबिन कमी झाल्यामुळे शरीराला पुरेशी ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे त्वचेचा रंग आणि तापमान बदलतो.

जखम उशिरा भरून येणं

जर पायांवरील कट किंवा फोड उशिरा भरत असतील, तर हे व्हिटॅमीन सी किंवा झिंकच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. हे दोन्ही घटक जखम भरून येण्यासाठी आणि नवीन पेशी तयार करण्यासाठी आवश्यक असतात.

पायांमध्ये सूज

पायांमध्ये सूज येणं हे प्रोटीनच्या कमतरतेमुळे होऊ शकते. प्रोटीन शरीरातील द्रव संतुलित ठेवण्याचं काम करतं. त्याची कमतरता झाल्यास ऊतींमध्ये पाणी साचते, म्हणून शरीरात पुरेसे प्रोटीन असणे आवश्यक आहे.

Sindhudurg Tourism: सिंधुदूर्गात लपलेला शिवकाळातील दुर्मिळ किल्ला! महाराजांच्या साम्राज्यातील गुप्त रणनीतीस्थळ

Sindhudurg Tourism | saam tv
येथे क्लिक करा